बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमवता आलं नाही तर येडियुरप्पा राजीनामा देतील असं सांगण्यात येत आहे.
इतकंच नाही तर मुख्यमंत्री विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी उभे राहतील, तेव्हा करावयाचं 13 पानाचं भाषण तयार असल्याचंही टीव्ही 9 कन्नडच्या वृत्तात म्हटलंय.
बीएस येडीयुरप्पा यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींनाही कल्पना दिल्याचं वृत्त आहे. आता बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी भाजपच्या बैठकांचं सत्र सुरू आहे.
भाजपकडे स्वत:चं 104 आमदारांचं संख्याबळ आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 112 हा आकडा गाठायचा आहे. त्यासाठी आज दुपारी 4 पर्यंत त्याबाबतची तजवीज करायची आहे.
दरम्यान, आज सकाळपासून कर्नाटक विधानसभेत आमदारांचे शपथविधी पार पडले.
येडियुरप्पांच्या मुलाने बंगळुरुतील हॉटेलवर दोन आमदारांना डांबून ठेवलं, असा आरोप काँग्रेसने केला. याशिवाय काँग्रेसने येडियुरप्पा काँग्रेस आमदाराशी सेटलमेंट करत असल्याची ऑडिओ क्लिपही जारी केली आहे.
या सर्व प्रकारानंतर आता कर्नाटक विधानसभेत काय होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या