World Health Day :  नागालँडचे मंत्री तेमजेन इम्रा अलॉन्ग (Temjen Imna Along) आपल्या खास शैलीतील भाषणासाठी, ट्वीटसाठी प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्सदेखील चांगल्या प्रमाणात आहेत. आज जागतिक आरोग्य दिनी (World Health Day) त्यांनी केलेले ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. डॉक्टरांकडून औषधोपचार सुचवले जातात. आज जागतिक आरोग्य दिनी तेमजेन यांनी तणावमुक्त जगण्यासाठी औषधं सुचवली आहेत. त्यांनी सुचवलेली औषधं व्हायरल होऊ लागली आहे. ही औषधं म्हणजे नागालँडमधील प्रसिद्ध स्थळं आहेत.


तेमजेन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आम्हाला माहीत आहे की, तुम्ही दररोजच्या धावपळीच्या आयुष्यामुळे तणावग्रस्त आहात. त्यामुळे आता तुम्हाला चांगली औषधे घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे. ही एक गोळी दररोज सकाळच्या नाश्त्यानंतर एक आठवडा घ्यायची आहे. तुम्हाला तणाव मुक्त होण्यास मदत मिळेल. तुम्ही तेमजेन यांच्याशी सल्लामसलत करू शकता.






एक दिवस फोटोही शेअर करणार


तेमजेन यांनी केलेल्या ट्वीटला युजर्सकडून मजेशीर प्रतिक्रिया मिळाली आहे. एका युजरने म्हटले की, योग आणि व्यायाम हे आजारांवर प्रभावी औषधे आहेत. तेमजेन यांनी याचे उत्तर देताना म्हटले की मी देखील दररोज व्यायाम, योगा करतो. त्याचेही फोटो लवकरच पोस्ट करणार आहे. 


एक युजरने नागालँडमध्ये फिरण्यासाठी योग्य वेळ कोणती, कोणता खाद्यपदार्थ नक्कीच खाल्ला पाहिजे असा प्रश्न विचारला. एका युजरने आपला अनुभव व्यक्त करताना सांगितले की, आपण स्वत: बायकर, पर्यटक आहे. जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो, तेव्हा आपण हरवलेली ऊर्जा, आशा आणि सकारात्मक दृष्टीकोण पुन्हा मिळवू शकतो. 


आज जागतिक आरोग्य दिन World Health Day


 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी, जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 1948 मध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली. ज्यामध्ये "जागतिक आरोग्य दिन" साजरा मागणी करण्यात आली होती. पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 1950 रोजी आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर दरवर्षी त्या तारखेला साजरा केला जातो. यंदा जागतिक आरोग्य दिनाचे 75 वे वर्ष आहे. जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम "सर्वांसाठी आरोग्य" अशी आहे.