World Aids Day 2022 : जागतिक एड्स दिन (World AIDS Day) दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. एड्स (एचआयव्ही) (HIV) हा मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसच्या (Human Immune deficiency virus) संसर्गामुळे होणारा असा हा आजार आहे. या आजाराबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. जागतिक एड्स दिन समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना जागृत करण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक एड्स दिनाचा इतिहास आणि यावर्षीची थीम नेमकी काय आहे ते जाणून घ्या. 


जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जगात 37.9 टक्के लोक एड्स या आजाराने ग्रस्त आहेत. तर सोसायटी ऑफ इंडियानुसार (Society of India), भारतात एड्सच्या एकूण रुग्णाची संख्या ही 2.35 मिलियन आहे. एड्सच्या रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी वाढ होत आहे. 


जागतिक एड्स दिनाची थीम (What is the theme of World AIDS Day 2022) :


जागतिक एड्स दिन 2022 ची थीम समानता आहे. जे लोक एड्स ग्रस्त आहेत, त्यांना समाजात भेदभावाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पीडितांसोबतचा भेदभाव संपवून त्यांना सन्मान देण्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे.


जागतिक एड्स दिनाचा इतिहास (History of World AIDS Day 2022) :


जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यूने जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार 1987 मध्ये मांडला होता. त्यानंतर 1988 मध्ये 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येतो.


ऑगस्ट 1983 मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या (World Health Organization), जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात याची संकल्पना मांडली. डॉ. मन् यांच्या सहमतीनंतर 1 डिसेंबर 1988 पासून हा दिवस पाळण्यात येऊ लागला. ‘जागतिक एड्स दिन’ प्रथम जेम्स डब्लू बून आणि थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये 1988 मध्ये साजरा केला. 


एड्स होण्याची मुख्य कारणे :



  • HIV / AIDS रुग्णाचे रक्त दुसऱ्या रूग्णाला दिल्याने

  • दूषित रक्त असलेल्या सुई, इन्जेक्शन मधून संसर्ग होण्याची शक्यता

  • HIV बाधित आईकडून स्तनपान करताना मुलाला होऊ शकतो.

  • असुरक्षित लैंगिक संबंधामुळे


एड्सची लक्षणे : 



  • कित्येक आठवड्यापासून ताप असणे

  • कित्येक आठवडे खोकला असणे

  • विनाकारण वजन कमी होत जाणे

  • तोंड येणे

  • भूक न लागणे, अन्नावरची इच्छा नाहीशी होणे

  • सतत जुलाब होणे

  • झोपताना घाम येणे


महत्त्वाच्या बातम्या : 


Important Days in December 2022 : महापरिनिर्वाण दिन, वर्षातील शेवटचा महिना यांसह डिसेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस