नवी दिल्ली : ऑफिसची शिफ्ट संपवून कर्मचारी कामावरून घरी गेल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला ऑफिसच्या कामापासून पूर्णपणे 'डिस्कनेक्ट' राहण्याचा अधिकार मिळावा यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'राईट टू डिस्कनेक्ट'चे विधेयक मागील आठवड्यात संसदेच्या पटलावर ठेवले आहे. आज या विधेयकावर चर्चा होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आज संसदेमध्ये खाजगी विधेयकांचा दिवस आहे. 'राईट टू डिस्कनेक्ट' हे सुप्रिया सुळे यांनी मांडलेलं एक महत्वाचे विधेयक आहे. हे विधेयक सुळे यांनी खाजगी विधेयक म्हणून मागील आठवड्यात संसदेच्या पटलावर ठेवले होते.
कर्मचारी घरी गेल्यानंतर म्हणजे ऑफिसची शिफ्ट संपल्यानंतर त्याला ऑफिसच्या कामापासून, मेलपासून पूर्णपणे 'डिस्कनेक्ट' राहण्याचा अधिकार मिळावा, शिफ्ट संपल्यानंतर बॉसचे कॉल रिफ्युज करण्याचा हक्क शिफ्टच्या वेळेनंतर किंवा सुट्टीत मिळावा, अशी मागणी या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
खाजगी विधेयके फारशी गांभीर्याने घेतली जात नाहीत. मात्र त्यातल्या काही विधेयकावर चर्चा होते. पण तशी विधेयके मंजूर झाल्याची उदाहरणे दुर्मिळ आहेत. मात्र खासदारांना त्यांच्या वैयक्तिक कक्षेत अशी विधेयक मांडण्याचा अधिकार असतो.
दर आठवड्याला खाजगी विधेयकांमध्ये अनेक अनोखे विषय ठेवले जातात. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सर्वच कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या विषयावर विधेयक मांडले आहे. या अनोख्या विषयाची चर्चा संसद परिसरात आहे.
ऑफिसची शिफ्ट संपल्यानंतर काम!, सुप्रिया सुळेंकडून 'राईट टू डिस्कनेक्ट'चे विधेयक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jan 2019 07:32 AM (IST)
कर्मचारी घरी गेल्यानंतर म्हणजे ऑफिसची शिफ्ट संपल्यानंतर त्याला ऑफिसच्या कामापासून, मेलपासून पूर्णपणे 'डिस्कनेक्ट' राहण्याचा अधिकार मिळावा, शिफ्ट संपल्यानंतर बॉसचे कॉल रिफ्युज करण्याचा हक्क शिफ्टच्या वेळेनंतर किंवा सुट्टीत मिळावा, अशी मागणी या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -