नवी दिल्ली : भारतात ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी देणार नसल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञानामुळे जर अनेकांचे रोजगार हिरावले जाणार असतील, तर त्याला कधीच संमती मिळणार नसल्याचं गडकरींनी सांगितलं.
एकीकडे गुगल, मर्सिडीजसारख्या टेक जायंट्सनी ड्रायव्हरलेस कार आणून क्रांती घडवण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र नितीन गडकरींनी आपण भारतात ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी न देण्याबाबत आपल्या मतांवर ठाम असल्याचं सांगितलं आहे.
'तंत्रज्ञानामुळे जर अनेकांवर बेरोजगारी ओढवणार असेल, तर ते मला मान्य नाही. देशात बेरोजगारी ही मोठी समस्या असताना टेक्नॉलॉजीमुळे अनेकांचे रोजगार हिरावलं जाणं परवडणारं नाही' असं गडकरी म्हणाले.
भारतात आजच्या घडीला 22 लाख व्यावसायिक चालकांची गरज आहे. सरकार देशभरात 100 चालक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याच्या विचारात आहे. पुढच्या पाच वर्षात पाच लाख जणांना नोकरी मिळेल, असा दावाही गडकरींनी केला.
प्रस्तावित मोटर वाहन (सुधारणा) बिल 2017 मध्ये अशाप्रकारे नव्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याची तरतूद आहे. हे विधेयक राज्यसभेत प्रलंबित आहे.
म्हणून ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी देणार नाही : गडकरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2017 10:21 AM (IST)
तंत्रज्ञानामुळे जर अनेकांवर बेरोजगारी ओढवणार असेल, तर भारतात ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी देणार नाही, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी घेतली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -