बंगळुरुत अपहरण करुन तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 02 May 2016 03:29 PM (IST)
बंगळुरु : बंगळुरुमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरुत एका तरुणाने भर रस्त्यातून एका तरुणीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. बंगळुरुमध्ये 25 वर्षीय तरुणीचं एका तरुणाने भर रस्त्यातून अपहरण केले. 23 एप्रिल रोजी ही घटना घडली. तरुणी पीजी हॉस्टेलमध्ये राहते. रात्री 9 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास तरुणी हॉस्टेलला परतत होती. त्यावेळी तरुण तिचा पाठलाग करत आला. एका चौकाजवळ आल्यावर तरुणी हॉस्टेलच्या दिशेने वळली आणि त्यावेळी पाठलाग करत असलेला तरुण सरळ चालत निघून गेला. त्यानंतर तरुणी फोनवर बोलण्यासाठी एका ठिकाणी थांबली. यावेळी पाठलाग करणारा तरुण पुन्हा मागून आला आणि तरुणीला उचलून घेऊन गेला. ही सारी घटना हॉस्टेलबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. नराधम तरुणाने त्या तरुणीला एका बिल्डिंगमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने आरडा-ओरड सुरु केली आणि त्या तरुणापासून स्वत:ची सुटका करुन घेतली. आजूबाजूचे लोक गोळा झाल्यानंतर तरुण तिथून पळून गेला. पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार केली असून, पोलिसांनी आतापर्यंत त्या तरुणाला अटक केलेली नाही. पाहा व्हिडीओ-