दिल्ली : दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात एका महिलेसह दोन मुलींनी मोबाईल शोरुमची तोडफोट केली आहे. महिलेनं या दुकानातून मोबाईल खरेदी केला होता. मोबाईलसोबत महिलेला शोरुमकडून इन्शुरन्सही देण्यात आला होता. महिलेचा मोबाईल बिघडल्यानं ती इन्शुरन्स कंपनीच्या पत्त्यावर गेली, मात्र त्याठिकाणी तिला कोणतंही ऑफिस मिळालं नाही.

या सर्व प्रकारानं संतापलेली महिला 20 फेब्रुवारीला शोरुममध्ये आली. महिलेनं शोरुमकडे नव्या फोनची मागणी केली. पण नवीन फोन देण्यास शोरुमनं नकार दिल्यानं कर्मचारी महिलांशी महिलेची वादावादी झाली. या प्रकारानंतर महिला आणि तिच्या दोन मुलींनी शोरुममध्ये जाऊन तोडफोड केली, तसंच कर्मचाऱ्यांना मारहाणही केली.

शोरुममध्ये गोंधळ घातल्यानंतर या महिलांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मादीपूर परिसरातील त्यांच्या घरात छापा टाकला, पण महिला आणि तिच्या दोनही मुली बेपत्ता झाल्या आहेत.


पाहा व्हिडीओ :