नवी दिल्ली : दिल्लीतील सनलाईट परिसरातून एका तरूणीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. एका रेस्टॉरंटमध्ये जेवण घेण्यासाठी आलेल्या पीडित तरूणीचं स्विफ्ट कारमधून आलेल्या दोन तरूणांनी अपहरण केलं. तिच्यावर गाडीतच अतिप्रसंग करून आईटीओ परिसरात तिला रस्त्यावरच फेकून दिलं आणि फरार झाले.
शनिवारी सकाळी साधारण साडेतीन वाजताच्या पीडितेनं पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडित तरूणीला पोलीस स्टेशनमध्ये आणलं. पीडित तरूणीनं पोलिसांना स्वीफ्ट कारचा नंबर सांगितल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
दोघेही आरोपी तरूण एमबीएचं शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यातला एक जण ऑस्ट्रेलियाहून भारतात परतला आहे. या दोघांवरही अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला.