#sandesh2soldiers या हॅशटॅगसह पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. माझ्याप्रमाणेच तुम्हीही जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा द्या, असं आवाहन मोदींनी केलं आहे.
https://twitter.com/narendramodi/status/789819852793876480
125 कोटी भारतीयांच्या शुभेच्छांनी धाडसी जवानांचं मनोबल वाढण्यास मदत होईल, असं मोदी म्हणाले. शुभेच्छा देण्यासाठी वेबसाईटवर खास ग्रीटिंग आणि इमोजी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, असं पीएमओच्या वतीने सांगण्यात आलं.