नवी दिल्ली : ऐन हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीत दिल्लीतलं राजकीय वातावरण तापणार आहे. कारण आजपासून (शुक्रवार) संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे.

जीएसटी, नोटबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे. तसेच या अधिवेशनात तिहेरी तलाकसारखे विधेयकही सरकार सभागृहात आणण्याच्या तयारीत आहे.

गुजरात, हिमाचलचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम?

मात्र, काल गुजरात निवडणुकांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीमुळं आता विरोधकही चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहेत. त्याचाच प्रत्यय या अधिवेशनात येणार आहे. दुसरीकडे विरोधकांना उत्तर देण्यासाठी सरकारही सज्ज झालं असल्यानं संसदेत बरीच खडाजंगी पाहायला मिळू शकते.

दरम्यान, अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काही दोनच दिवसांपूर्वी सर्व पक्षीय नेत्यांची बैठकही बोलावली होती.

संबंधित बातम्या :


गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी


गुजरातचा सर्वात मोठा एक्झिट पोल