मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टीत यंदा गोवा ही भारतीय पर्यटकांची पहिली पसंती आहे. तर सिंगापूर हे परदेशातील हॉट डेस्टिनेशन आहे. पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुट्टी एन्जॉय करत आहेत.
ट्रिप अॅडव्हायजर 'समर व्हेकेशन व्हॅल्यू' रिपोर्टनुसार उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गोवा ही भारतीयांची पहिली पसंती आहे. त्यानंतर उटी, महाबळेश्वर, मसुरी आणि कोडाईकॅनल या ठिकाणांना पसंती दिली जाते.
या यादीत केरळच्या मुन्नार सातव्या क्रमांकावर आहे तर श्रीनगर आठव्या स्थानी आहे. दहा पर्यटन स्थळांच्या यादीत नैनीताल नवव्या क्रमांकावर तर लोणावळा दहाव्या नंबरवर आहे.
हा रिपोर्ट 1 मे ते 31 जुलै 2017मध्ये भारतीय पर्यटकांनी केलेल्या बुकींग डेटावर आधारित आहे. याच रिपोर्टनुसार, परदेशात फिरण्यासाठी सिंगापूर ही पहिली पसंती आहे. त्यानंतर बाली, बँकॉक आणि दुबईचा नंबर लागतो.