Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 9 दिवसांच्या अंतराने सलग दुसऱ्यांदा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना गर्भित इशारा दिला आहे. शुक्रवारी संसदेबाहेर राहुल यांनी निवडणूक आयोग मते चोरत आहे. आमच्याकडे अणुबॉम्ब आहे. जेव्हा त्याचा स्फोट होईल तेव्हा निवडणूक आयोग टिकणार नाही, असा इशारा दिला. निवडणूक आयोगात मते चोरणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. तुम्ही देशाविरुद्ध काम करत आहात, जे देशद्रोह आहे. तुम्ही कुठेही असाल, जरी तुम्ही निवृत्त झालात तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू. यापूर्वी 24 जुलै रोजी राहुल म्हणाले होते की, मी निवडणूक आयोगाला एक संदेश देऊ इच्छितो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यातून सुटाल, जर तुमच्या अधिकाऱ्यांना वाटत असेल की ते त्यातून सुटतील, तर हा तुमचा गैरसमज आहे. आम्ही तुम्हाला सोडणार नाही.'
निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया
दरम्यान, राहुल गांधी यांच्या आरोपांवर आयोगाने प्रतिक्रिया दिली असून आयोग अशा निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करते. सततच्या धमक्या असूनही, आम्ही सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्यास सांगू इच्छितो. बेजबाबदार विधानांकडे दुर्लक्ष करा, असे म्हटले आहे.
माझ्याकडे चोरीचे 100 टक्के पुरावे
राहुल पुढे म्हणाले की मी हे हलक्यात बोलत नाही, तर शंभर टक्के पुराव्यांसह बोलतो. आम्ही ते जाहीर करताच, संपूर्ण देशाला कळेल की निवडणूक आयोग भाजपसाठी मते चोरण्याचे काम करत आहे. मध्य प्रदेश निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत आम्हाला शंका होत्या, महाराष्ट्र निवडणुकीत आमच्या शंका वाढल्या.
आम्ही सुटू हा तुमचा गैरसमज
24 जुलै रोजी राहुल म्हणाले, 'कर्नाटकच्या एका जागेवर निवडणूक आयोगाने घोटाळा केला. आमच्याकडे याचे 100 टक्के पुरावे आहेत. त्याच मतदारसंघात 50, 60 आणि 65 वर्षांच्या हजारो नवीन मतदारांना यादीत समाविष्ट करण्यात आले आहे आणि 18 वर्षांवरील मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे.' 'एका जागेची चौकशी करताना आम्हाला ही अनियमितता आढळली. मला खात्री आहे की प्रत्येक जागेवर असेच नाटक सुरू आहे. मी निवडणूक आयोगाला संदेश देऊ इच्छितो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यातून सुटाल, तर हा तुमचा गैरसमज आहे. दुसरीकडे, राहुलसह संपूर्ण विरोधक बिहार मतदार पडताळणीबाबत निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. विरोधी पक्ष संसदेच्या बाहेर आणि आत निषेध करत आहेत. दरम्यान, बिहारमध्ये निवडणूक आयोगाने शुक्रवारी राजकीय पक्षाला मतदार यादीचा नवीन मसुदा जारी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या