...तर 'मोटरसायकल' अखिलेश यादवांचं निवडणूक चिन्ह?
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2017 11:15 AM (IST)
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बाप-बेट्याची लढाई आता अंतिम टोकाला पोहोचली आहे. समाजवादी पक्षाच्या सायकल चिन्हासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. मुलायम सिंह यादव यांच्या गटाने सायकल चिन्हावर दावेदारी सांगितल्यानंतर, आज अखिलेश यादव गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. समाजवादी पार्टीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर अखिलेश स्वतंत्र पक्ष स्थापन करतील, अशी भीती मुलायम यांना आहे. त्यामुळे सायकलवर स्वार होण्यासाठी दोन्ही गटांमध्ये अटीतटीची लढाई सुरु आहे.