जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमक, एक दहशतवादी ठार
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2017 07:54 AM (IST)
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आहे. बारामुल्लाच्या हरितार तारजू परिसरात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सैन्याने सर्च ऑपरेशनला सुरुवात झाली. सर्च ऑपरेशनदरम्यानच दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरु झाला. चकमक अजूनही सुरु असल्याची माहिती मिळत आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांकडून हत्यारं आणि दारु-गोळा जप्त करण्यात आला आहे. https://twitter.com/ANI_news/status/816092171396755456