भोपाळ : हल्ली आपल्याकडे दाढी वाढवण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. महाविद्यालयीन तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण मोठी दाढी वाढवून 'माचो' लूकमध्ये फिरत असल्याचे आपण पाहतोय. परंतु या दाढीने मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याचा संसार घटस्फोटापर्यंत नेऊन ठेवला आहे.
तीन वर्षांपूर्वी भोपाळमध्ये राहत असलेल्या एका सिंधी तरुणाने ब्राह्मण तरुणीशी लग्न केले. वर्षभर दोघांनी सुखी संसार केला. परंतु त्यानंतर नवऱ्याने दाढी वाढवली. ही दाढी पत्नीला खटकू लागली. या दाढीमुळे दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली.
"नवरा दाढी करत नाही, थंडी असल्याचे कारण पुढे करुन आंघोळ करत नाही, परफ्यूम लावून अंगाला येणारा दुर्गंध लपवण्याचा प्रयत्न करतो," या कारणांवरून या महिलेने नवऱ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने घटस्फोटासाठी अर्जदेखील दाखल केला आहे.
बायकोने घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतरही नवऱ्याने माघार घेतलेली नाही. या माणसाला आपल्या बायकोपेक्षा त्याची दाढीच अतिप्रिय आहे. कारण या विचित्र माणसाने "काहीही झालं तरी दाढीला ब्लेड लावणार नाही," असे स्पष्ट उत्तर न्यायालयात दिले आहे.
"मी कसं जगायचं, काय करायचं, हे मी ठरवेन, या गोष्टी मला बायकोने सांगायची गरज नाही", अशा शब्दात पतीने अधिकाऱ्यांसमोरच पत्नीला सुनावलं आणि मी बदलणार नाही हे स्पष्ट केले आहे.
नवरा दाढी आणि आंघोळ करत नसल्यामुळे पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Apr 2019 05:58 PM (IST)
हल्ली आपल्याकडे दाढी वाढवण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. महाविद्यालयीन तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण मोठी दाढी वाढवून 'माचो' लूकमध्ये फिरत असल्याचे आपण पाहतोय. परंतु या दाढीने मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याचा संसार घटस्फोटापर्यंत नेऊन ठेवला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -