नवी दिल्ली : राहुल गांधींच्या चेहऱ्यावरील हिरवी लाईट स्नाईपर हल्ल्यासंबधीची नसून काँग्रेसच्याच छायाचित्रकाराच्या मोबाईलचा प्रकाश असल्याचं गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तसेच राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कोणतीही चूक झाली नसल्याचं गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.


राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना चिट्ठी लिहिली होती. काल अमेठी येथील प्रचारादरम्यान राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर हिरवा लेझर लाईट आढळली होती. त्यानंतर गृह मंत्रालयाने एसपीजीच्या डायरेक्टर यांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.


एसपीजीच्या डायरेक्टर यांनी गृह मंत्रालयाला दिलेल्या माहिती म्हटलं की, या घटनेची व्हिडीओ क्लिपचं निरीक्षण केल्यानंतर ती हिरवी लाईट काँग्रेसच्याच फोटोग्राफरच्या मोबाईलची आहे. तसेच कॅमेरामनच्या पोझिशनबाबत राहुल गांधी यांच्या खासगी स्टाफला कळवण्यात आलं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कोणतीही कमी नसल्याचं एसपीजीच्या डायेरक्टर यांनी स्पष्ट केलं आहे.



याप्रकरणी काँग्रेस नेते अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याचं समोर आलं होत. मात्र अशा प्रकारे कोणतंही पत्र काँग्रेसने गृह मंत्रालयाला लिहिलं नसल्यांचं काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केलं आहे.


या पत्रावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमहत पटेल आणि रणदीप सुरजेवाला यांचं हस्ताक्षर आहे. त्यामुळे कुणी व्हायरल केलं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 'भारताचे दोन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासोबत घातपात झाला होता. 1991 साली लोकसभा निवडणुकांच्या काळातच राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती.' असा उल्लेखही या पत्रात करण्यात आला होता.