8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.  महिला दिनाच्या शुभ मुहूर्तावर बर्गर किंग यांनीही ट्विट करुन महिलांचे अभिनंदन केले. मात्र, महिलांना शुभेच्छा देण्याची कंपनीची पद्धत सोशल मीडिया वापरकर्त्यांना अजिबात आवडली नाही. कंपनीचे ट्विट वाचताच वापरकर्त्यांनी टीका करण्यास सुरवात केली. बर्गर किंगच्या ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.


फूड चेन चालवणाऱ्या कंपनीने 'महिलांच्या जागा स्वयंपाकघरात' असे ट्विट केले होते. बर्गर किंगच्या या ट्विटनंतर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यात केएफसीही मागे राहिली नाही. केएफसीनेही बर्गर किंगला फटकारले आहे.




बर्गर किंगने पहिले ट्विट का काढले?
जेव्हा कंपनीला अनेक अपमानास्पद टीकांचा सामना करावा लागला, तेव्हा कंपनीने त्यांच्या ट्विटबद्दल दिलगिरी व्यक्त करत पहिले ट्विट हटविले आणि दुसऱ्या ट्विटमधून याचे कारण स्पष्ट केले.






बर्गर किंगची माफीनामा:
पहिल्या ट्वीटनंतर कंपनीने आणखी एक ट्विट केले, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, 'आमच्या किचनमध्ये केवळ 20 टक्के महिला शेफ आहेत. जर महिलांना आमच्यासोबत येण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. आम्हाला या क्षेत्रात महिलांची संख्या वाढवून यात बदल घडवायचा आहे. यासाठी आम्ही एका मोहिम राबवत आहोत आणि म्हणूनच आम्ही ते ट्विट केले होते. पण आमच्या पहिल्या ट्वीटबद्दल आम्ही सर्वांकडून दिलगीर आहोत. 'बर्गर किंगच्या दिलगिरीच्या ट्विटनंतरही वापरकर्त्यांनी बरीच टीका केली.