लखनऊ : उत्तर प्रदेशातल्या ऐतिहासिक निकालानंतर मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याची चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप कार्यालयात जंगी सत्कार केला जाणार असून त्यानंतर भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत सीएमच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.


उत्तर प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. त्याचप्रमाणे खासदार साक्षी महाराज आणि योगी आदित्यनाथ देखील मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं जातं. लखनऊचे महापौर दिनेश शर्मा यांचं नावही वारंवार पुढे येत आहे.

दिनेश शर्मा यांची भाजपमधील ‘क्लीन पर्सनॅलिटी’ म्हणून ओळख आहे. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी दिनेश शर्मा यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे.

मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री होणार नाही, माझ्याकडे बरंच काम आहे आणि मी उत्तर प्रदेशचा मतदारही नाही, असं भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी निकालाच्या दिवशीच स्पष्ट केलं होतं.

भाजपच्या संसदीय मंडळाची संध्याकाळी बैठक आहे. याच बैठकीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी कोण बसेल, याची निवड केली जाईल.

संबंधित बातम्या :


Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल


लखनऊचे महापौर उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री?


उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदासाठी भाजपची 'ही' दोन नावं शर्यतीत !


चार राज्यात भाजपचं सरकार, उद्या मुख्यमंत्री ठरवू : अमित शाह


UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल