Vande Mataram Newspaper History : लोकसभेमध्ये (Lok Sabha) वंदे मातरम (Vande Mataram) या घोषणेवर चांगलीच चर्चा रंगत असल्याचं चित्र आहे. 1875 साली बकिम चंद्र चटर्जी यांनी 1875 साली बंगाली आणि संस्कृत भाषेत वंदे मातरम हे गीत लिहिलं. त्याला आता 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यावर पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय. असंख्य स्वातंत्र्यसैनिक (Freedom Fighters) फाशीच्या क्षणीही 'वंदे मातरम'चा नारा देत होते. विविध तुरुंगांत वेगवेगळ्या ठिकाणी लढणाऱ्या क्रांतिकारकांचा एकच मंत्र होता आणि तो म्हणजे वंदे मातरम (Vande Mataram Chant).
बकिम चंद्र चटर्जी यांनी त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत वंदे मारतम गीताचा समावेश केला. त्यानंतर रविंद्रनाथ टागोर यांनी या गीताला चाल लावली. बंगालच्या फाळणीच्या वेळी, 1905 साली ज्यावेळी स्वातंत्रलढा त्याच्या सर्वोच्च शिखरावर होता त्यावेळी क्रांतिकारकांच्या मुखी वंदे मारतम हाच नारा होता. त्याचवेळी वंदे मातरम या नावाने एक वृत्तपत्रही सुरू करण्यात आलं होतं.
बिपिन चंद्र पाल यांचे वृत्तपत्र (Bipin Chandra Pal’s Newspaper)
राष्ट्रवादी नेते बिपिन चंद्र पाल यांनी 1906 साली कोलकात्याहून ‘वंदे मातरम’ नावाचे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले. त्यावेळी एकीकडे बंगालच्या फाळणीविरोधात आंदोलन सुरू होतं, त्याचवेळी राष्ट्रवादी विचारसरणीच्या नेत्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून इंग्रजांविरोधात लढा पुकारला. वंदे मातरम हेदेखील त्यापैकीच एक. राष्ट्रवाद जागवणे, स्वदेशीला प्रोत्साहन देणे, भारतीयांची राजकीय आकांक्षा लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यामागचा उद्देश होता. बिपिन चंद्र पाल यांचे हे साप्ताहिक लवकरच एक प्रभावी बौद्धिक शस्त्र बनले.
वंदे मातरम वृत्तपत्रांचे योगदान (Role of Vande Mataram Newspapers)
वंदे मातरम हा नारा जितका जोशीला, तितकाच तो वृत्तपत्रामध्येही प्रभावी ठरला. त्या काळात ब्रिटिश सरकारविरोधी लढ्यामध्ये वृत्तपत्र हे मोठं शस्त्र होतं. अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी लोकजागृतीसाठी, ब्रिटिश धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठी वृत्तपत्रांची सुरुवात केली.
अरविंद घोष संपादक (Aurobindo Ghosh as Editor Vande Mataram)
बिपिन चंद्र पाल यांनी वंदे मातरम वृत्तपत्र सुरू केल्यानंतर अरविंद घोष यांनी त्याचे संपादकपद स्वीकारले. त्यावेळी या साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर करण्यात आलं. अरविंद घोष यांनी वंदे मातरमला काँग्रेसच्या जहालमतवादी राष्ट्रवादी गटाचा प्रमुख आवाज बनवले.
ब्रिटिश सरकारने या वृत्तपत्राला अत्यंत धोकादायक मानले. एवढेच नव्हे, तर 1910 चा प्रेस अॅक्ट लागू करण्यामागे हे वृत्तपत्र एक महत्त्वाचे कारण असल्याचेही म्हटले गेले.
मॅडम भिकाजी कामा यांनी पॅरिसमधून वृत्तपत्र (Bhikaji Cama’s Vande Mataram Paris)
1909 मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी पॅरिसमधून ‘वंदे मातरम’ नावाचे राष्ट्रवादी वृत्तपत्र सुरू केले. भारतातील राष्ट्रवादाला बळ देणे, ब्रिटिशविरोधी वातावरण निर्माण करणे यासाठी त्यांनी Paris Indian Society ची स्थापना केली आणि तिथूनच वंदे मातरम हे वृत्तपत्र प्रकाशित केले. हे प्रकाशन ब्रिटिशांच्या बंदी आणि दडपशाहीला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आले होते.
ही बातमी वाचा: