नवी दिल्ली: पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रविवारी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, अशा शब्दात सर्व भारतीयांना विश्वास दिला.


पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन या घटनेचा निषेध केला. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, ''उरीमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध आहे. मी देशाला विश्वास देतो की, हा हल्ला ज्यांनी कोणीही केला असेल, त्यांना शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही.'' मोदी आपल्या ट्वीटमध्ये पुढे म्हणाले की, ''मी याविषयावर संरक्षण मंत्री आणि गृह मंत्र्यांशी चर्चा केली आहे. संरक्षण मंत्री परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीरला रवाना होत आहेत.''

या हल्ल्याचा अनेक नेत्यांसह सर्वच क्षेत्रातून निषेध

राजनाथ सिंह : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांचा देश म्हटलं आहे. पाकिस्तान सातत्याने प्रत्यक्ष रुपात दहशतवादाचे समर्थन करत आहे. यामुळे आम्ही निराश आहोत. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी ट्वीट करुन शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केलं आहे.

मेहबूबा मुफ्ती: जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांनी हा हल्ला म्हणजे काश्मीर खोऱ्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

मुफ्ती म्हणाल्या की, ''मी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करते. हा हल्ला राज्यातील शांतता बिघडवणे, तसेच युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी भारत-पाक संबंधावरही भाष्य केले.'' त्या म्हणाल्या की, ''जम्मू-काश्मीर हे राज्य नेहमीच भारत-पाक संबंधाचा शिकार झाले आहे. अन् याची भरपाई येथील जनता गेल्या सहा दशकापासून करत आहे.''

राम माधव: भाजप महासचिव यांनीही या हल्ल्याचे तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांनी, 'जर तुमचा एखाद्याने एक दात तोडला, तर त्याचा जबडा तोडला पाहिजे,' अशी प्रतिक्रीया दिली आहे.

लालू प्रसाद यादव: राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी या हल्ल्यासाठी केंद्रातील मोदी सरकारचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. लालू प्रसाद यादव म्हणाले की, ''नरेंद्र मोदी यांच्या हलगर्जीपणामुळे आपले जवान शहीद झाले, आणि जम्मू-काश्मीर आपल्या हातून निसटत आहे. आता कणखर भूमिका घेऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे.'' या हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबीयांप्रतिही त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

अरविंद केजरीवाल: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करुन उरीमधील दहशतवादी हल्ल्यात शहीदांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करुन हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. भारताने या हल्ल्यासमोर झुकू नये.

आर. के. सिंह: देशाचे माजी गृहसचिव आणि भाजपचे खासदार आर. के. सिंह यांनी केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात हिट बँकची रणनीति वापरण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच हा हल्ला भ्याड असल्याचं, आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे. शिवाय या हल्ल्यावेळी भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादनही केलं आहे.

वीरेंद्र सेहवाग: वीरुने आपल्या ट्वीटमध्ये, ''उरी हल्ल्याची माहिती मिळताच मनावर आघात झाला. ते बंडखोर नव्हेत, तर ते दहशतवादीच आहेत. दहशतवादाला, योग्य ते प्रत्युत्तर दिलंच पाहिजे,'' अशी भावना व्यक्त केली आहे.

विराट कोहली: भारतीय कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली याने या घटनेचा निषेध करण्यासाठी शब्द नसल्याचं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अमिताभ बच्चन: महानायक अमिताभ बच्चन यांनी भारतीय क्रिकेटचा तडाखेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचे ट्वीट रिट्वीट करुन आपला राग व्यक्त केला आहे. तसेच या वेदना कृतीतून व्यक्त करण्याची गरज आहे, असं म्हटलं आहे.

लता मंगेशकर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजातील 'ए मेरे वतन के लोगो' हे गाणं ट्वीट करुन, उरीमधील दहशतवादी हल्ला भ्याड असल्याचा ढळढळीत पुरावा असल्याचं म्हटलं आहे.

शाहरुख खान: बॉलिवूडचा बादशाह किंग खान यानेही ट्वीट करुन या घटनेचा निषेध केला आहे. उरीमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याची बातमी ऐकून वेदना होत आहेत. या हल्ल्यात शहीदांच्या कुंटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच दहशतवाद्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळेल असं म्हटलं आहे.

अक्षय कुमार: बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार यानेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. अक्षयने ट्वीट करुन शहीदांना श्रद्धांजली वाहिली. अक्षयने आपल्या ट्वीटमध्ये जे झालं ते पूरं झालं, आता दहशतवाद्यांना रोखणे गरजेचे आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या


महाराष्ट्राच्या चार सुपुत्रांना वीरमरण, शहीदांचा आकडा 18 वर


जम्मू काश्मीर : उरीमध्ये आत्मघाती हल्ला, 17 जवान शहीद


उरी हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानीच, भारतीय लष्कराची माहिती


पाकिस्तानची भारताला पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी


वरातीऐवजी अंत्ययात्रा, नाशिकचे शहीद ठोक यांचं कुटुंब शोकसागरात

शहीदांना श्रद्धांजली वाहताना गंभीरनं ‘या’ क्रिकेटरवर निशाणा साधला?

उरीच्या सैन्यतळावर पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज

पाकच्या हद्दीत घुसून जशास तसे उत्तर द्या, सैन्यातून मागणी

हृदय पिळवटून टाकणारे वीरुचे ट्वीट