हृदय पिळवटून टाकणारे वीरुचे ट्वीट
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2016 05:48 PM (IST)
मुंबई: भारतीय क्रिकेटचा तडाखेबाज माजी फलंदाज त्याच्या हटके ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत असतो. रिओ ऑलिम्पिकमधील भारताच्या यशावर टीका करणाऱ्या ब्रिटीश पत्रकाराला त्याने ज्या शब्दात प्रत्युत्तर दिले, त्यावर सर्व भारतीयांनी त्याचे कौतुक केले. मात्र, रविवारी काश्मीरच्या उरीमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली देणाऱ्या त्याच्या ट्वीटचे शब्द सर्वच भारतीयांचे हृदय पिळवटून टाकणारे आहेत. त्याच्या या ट्वीटमध्येही त्याने आपली संवेदना बोलून दाखवली आहे. तसेच दहशतवाद्यांना त्याच शब्दात प्रत्युत्तर दिले पाहिजे अशी भावनाही व्यक्त केली आहे. वीरुने उरी हल्ल्याचा निषेध करण्यासोबतच, शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणारे, असे दोन ट्वीट केले आहेत. वीरुने आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये, ''उरी हल्ल्याची माहिती मिळताच मनावर आघात झाला. ते बंडखोर नव्हेत, तर ते दहशतवादीच आहेत. दहशतवादाला, योग्य ते प्रत्युत्तर दिलंच पाहिजे,'' अशी भावना व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या ट्वीटमधून त्याने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. वीरुने आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये, ''17 जीव, त्यांनाही कुटुंब होतं, त्यांनाही मुलं-बाळं होती. ते मातृभूमीची सेवा करत होते. पण हे दृश्य पाहून अतिशय वेदना होत आहेत.''