दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर शाईफेक
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2016 01:07 PM (IST)
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर शाईफेक झाली. दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांच्या घराबाहेर सिसोदिया यांच्यावर शाईफेक करण्यात आली. मनिष सिसोदिया नजीब जंग यांना भेटण्यासाठी सिसोदिया त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी मीडियाशी बोलतानाच त्यांच्यावर कोणतही शाई फेकली. शाईफेकीच्या प्रकारामागे काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. मनिष सिसोदिया रविवारीच फिनलँडच्या दौऱ्यावरुन परतले. दिल्लीत डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारखे आजारांनी धुमाकूळ घातला असताना, त्यांच्या परदेश दौऱ्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.