नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. यावेळी अनलॉक-2 लागू झाल्याची घोषणा त्यांनी केली. मात्र कोरोनाचा सामना करताना आपल्याला काळजी घेणे आणि कोरोनाला रोखण्यासाठी नियामांचं पालन करण्याचीही आवश्यकता आहे, असं त्यांनी सांगितल. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नियम पाळण्याचा सल्ला देताना नरेंद्र मोदी यांनी एका देशाच्या पंतप्रधानांचं उदाहरण दिलं. त्या पंतप्रधानांनी कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन केलं नाही म्हणून त्यांना 13 हजारांचा दंड भरावा लागला, असं मोदींनी सांगितलं. मात्र ते पंतप्रधान कोण आहेत? कोणत्या देशाचे ते पंतप्रधान आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांचा उल्लेख केला ते बुल्गारियाचे पंतप्रधान बोयको बेरिसेव्ह आहेत. बोयको बेरिसेव्ह यांनी कोरोनाच्या नियमांचं पालन केलं नाही म्हणून त्यांना 174 डॉलर म्हणजे 13 हजारांचा दंड भरावा लागला. बुल्गारियामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आरोग्य विभागाने नियम कडक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात बोयको बेरिसेव्ह एका चर्चमध्ये गेले होते, त्यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता म्हणून त्यांना हा दंड भरावा लागला. केवळ पंतप्रधान बोयको बेरिसेव्हचं नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या ज्यांनी नियमांच उल्लंघन केलं त्यांनाही दंड भरावा लागला. हे उदाहरण देताना पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, भारतातही गावाचा प्रमुख असू किंवा देशाचा प्रमुख सर्वांना नियम सारखे आहेत.
PM Modi | पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत नोव्हेंबरपर्यंत गरजूंना मोफत धान्य
भाषणात काय म्हणाले मोदी?
देशात अनलॉक-2 लागू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पावसाळा आला असल्याने स्वतःची काळजी घेण्याचं आवाहनही पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलं आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन नागरिकांनी योग्य पद्धतीने केल्याने भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. राज्य सरकार, देशातील नागरिक आणि संस्थांनी अशाच प्रकारची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. नियमांचं पालन करणाऱ्यांना समजावलं पाहिजे. अनलॉक-1 मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना दिलसा आहे, ही बाब चिंताजनक आहे. देशाचा पंतप्रधान असो किंवा सामान्य नागरिक सर्वांना नियम एकसारखे आहेत.
PM Narendra Modi Full Speech | पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?