भूपेन हजारिका यांचा जन्म आसाममधील तिनसुकीया जिल्ह्यातील सदिया गावात झाला. 1946 मध्ये हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रातून पदवी मिळवली. त्यानंतर न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएचडीचं शिक्षण घेतलं.
भूपेन हजारिका यांना 1975 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने तर 1992 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरव करण्यात आला.
पुरस्कार
- 1975 मध्ये सर्वोत्कृष्ट प्रादेशिक सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार
- 1992 मध्ये भारतीय सिनेविश्वातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारनं सन्मान.
- 2009 मध्ये असोमरत्न आणि त्याच वर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्कार.
- 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं गौरव.
- पद्म विभूषण, पद्मश्री, मुक्तिजोधा पदक आदी पुरस्कारांनी भूपेन हजारिका यांचा सन्मान करण्यात आला आहे.