मुंबई : तरुण मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आज (25 जानेवारी) राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरनेही #PowerOf18 अशी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून तरुणाईला मतदानासाठी उद्युक्त करण्यावर ट्विटर भर देणार आहे.
#PowerOf18 मोहिमेअंतर्गत नव्याने मतदार होणाऱ्या तरुणाईला निवडणुकांबद्दल माहिती देणे, तसंच मतदानाच्या सामाजिक जाणिवेबद्दल जागृत करण्याचा प्रयत्नही ट्विटरकडून केला जाणार आहे. यासाठी ट्विटरने #PowerOf18 हा हॅशटॅगही तयार केला आहे.
ट्विटरची ही मोहीम सीईओ जॅक डोरसी आणि माया हरी यांनी लॉन्च केली आहे. यासंदर्भात आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांसोबत विशेष चर्चासत्रही घेण्यात आलं होतं.
आम्ही भारतात #PowerOf18 मोहीम लाँच करत आहोत. या मोहिमेच्या माध्यमातून भारतातील तरुणाईला बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत. त्यामुळे नवमतदार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी पुढे येतील, अशी आम्हाला आशा असल्याचं माया हरी यांनी मोहिमेच्या लाँचिंगवेळी स्पष्ट केलं होतं.
ट्विटरने आगामी निवडणुकांसाठी एक सर्व्हेही घेतला होता. यामध्ये तीन हजार 622 तरुणांची मतं नोंदवण्यात आली. यात 94 टक्के तरुणांनी आगामी निवडणुकीत मतदान करण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.
#NationalVotersDay : नवमतदारांसाठी ट्विटरची #PowerOf18 मोहीम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2019 06:23 PM (IST)
#PowerOf18 मोहिमेअंतर्गत नव्याने मतदार होणाऱ्या तरुणाईला निवडणुकांबद्दल माहिती देणे, तसंच मतदानाच्या सामाजिक जाणिवेबद्दल जागृत करण्याचा प्रयत्नही ट्विटरकडून केला जाणार आहे. यासाठी ट्विटरने #PowerOf18 हा हॅशटॅगही तयार केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -