Kadambari Jethwani : दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री कादंबरी जेठवानीचे शोषण केल्याप्रकरणी तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी धमकावूनखोट्या प्रकरणात 40 दिवस कोठडीत ठेवल्याचा आरोप कादंबरीने केला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने या प्रकरणी मोठी कारवाई करत डीजी दर्जाच्या अधिकाऱ्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने कादंबरी चर्चेत आली आहे.






कांदबरीने झालेल्या शोषणाविरोधात तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये तिने दावा केला होता की तिला तपासाशिवाय आणि ठोस पुराव्याशिवाय अटक करण्यात आली. जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून तिला आणि तिच्या कुटुंबियांना अडकवण्यात आल्याचे तिनं म्हटलं आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी फेब्रुवारीमध्ये कादंबरीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. विद्यासागर यांच्यासह या अधिकाऱ्यांनी तिचा आणि तिच्या पालकांचा छळ केल्याचा आरोप कादंबरीने केला आहे. कोणतीही सूचना न देता अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचा अवमान केल्याचे आरोपात म्हटले होते. 






तीन अधिकारी निलंबित 


या प्रकरणी माजी गुप्तचर प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू (डीजी रँक), माजी विजयवाडा पोलिस आयुक्त क्रांती राणा टाटा (महानिरीक्षक दर्जा) आणि माजी पोलिस उपायुक्त विशाल गुन्नी (अधीक्षक दर्जा) यांना निलंबित करण्यात आले आहे.


कादंबरी जेठवाणी आहे तरी कोण?


कादंबरी जेठवानी एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने 2015 मध्ये फेमिना मिस गुजरातचा किताब जिंकला आहे आणि फेमिना मासिकाची कव्हर गर्ल देखील आहे. कादंबरी जेठवानी हिंदी, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2012 मध्ये आलेल्या 'सादा अड्डा' या सिनेमातील तिची व्यक्तिरेखा खूप आवडली होती. कादंबरीचा जन्म अहमदाबादमध्ये झाला असून ती 28 वर्षांची आहे. वडिलांचे नाव नरेंद्र कुमार असून ते नौदलाचे अधिकारी होते आणि त्यांची आई रिझर्व्ह बँकेत व्यवस्थापक होती आणि अर्थशास्त्रात सुवर्णपदक विजेती होती.






काय होतं प्रकरण?


फेब्रुवारी महिन्यात वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी दक्षिण अभिनेत्री कादंबरी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. 2 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला असला तरी अभिनेत्रीला 31 जानेवारीलाच अटक करण्यात आली होती. तडकाफडकी अटक करून मुंबईहून विजयवाडा येथे नेण्यात आले आणि जामीन मिळण्याची संधी मिळाली नाही. 40 दिवस चौकशीशिवाय कोठडीत ठेवण्यात आले आहे. तसेच आई-वडिलांना त्रास दिला.


इतर महत्वाच्या बातम्या