रायपूर : कडकनाथ कोंबडीवरुन दोन राज्यांमध्ये झुंज लागली आहे. कडकनाथ कोंबडी ही जात कुणाची, यावरुन मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यात जुंपली आहे. ही कोंबडी मूळची आपल्याच राज्यातली असल्याचा दावा या राज्यांनी केला.

याबाबत जीआय मानांकन देणाऱ्या संस्थेकडे अर्ज करण्यात आला आहे. कडकनाथ कोंबडीच्या औषधी गुणधर्मांमुळे ती देशभर प्रसिद्ध आहे. ही कोंबडी मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यातली असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे छत्तीसगडच्या दंतेवाडा भागातील वातावरण अशा कोंबड्यांसाठी पोषक असल्याचा दावा केला जातोय.

इतकंच नाही, तर दंतेवाड्यातील आदिवासी महिला 160 हून अधिक पोल्ट्री चालवत असल्याचा दावाही छत्तीसगडकडून करण्यात आलाय. तेव्हा आता नेमकं कोणत्या राज्याला कडकनाथचं जीआय नामांकन मिळतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.