ओला-उबरचे चालक मध्यरात्रीपासून संपावर
एबीपी माझा वेब टीम | 19 Mar 2018 07:38 AM (IST)
मुंबईमध्ये सध्या ओला-उबरच्या सुमारे 45 हजार कॅब आहेत.
मुंबई : मुंबईसह दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद आणि पुण्यातील ओला, उबरचे चालक मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे या संपाचा फटका देशातल्या प्रमुख शहरातल्या प्रवाशांना बसणार आहे. कंपन्यांच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. चालकांनी पाच ते सात लाख रुपये गुंतवले आहेत. दीड लाख रुपये प्रतिमहिना मिळतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यातील अर्धी रक्कमही या कंपन्यांनी दिली नसल्याची तक्रार आहे. मुंबईमध्ये सध्या 45 हजार कॅब आहेत. प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत संप चालूच राहिल, असं महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी सांगितले आहे.