नेहा आणि ज्योती या उत्तर प्रदेशातील बनवारी तोला गावातल्या रहिवासी. 2014 मध्ये त्यांचे वडील आजारी पडले. न्हावी म्हणून काम करणाऱ्या वडिलांचं हातावर पोट. कर्ता पुरुषच आजारी पडल्याने घरगाडा हाकणं कठीण झालं. त्यामुळे लेकींनी हाती वस्तरा धरला.
पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात मुलींनी पाय रोवण्यास सुरुवात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र वडिलांच्या आजारपणाचा खर्च उचलण्याचं ध्येय असल्यामुळे दोघींनी मागे वळून पाहिलं नाही.
आज, खुद्द सचिन तेंडुलकरने त्यांच्या कार्याची दखल घेतली. सचिनने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन दोघींना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे सचिनने या दोघींच्या साथीने अनोखा विक्रम रचला. सचिनने पहिल्यांदाच इतरांकडून दाढी करुन घेतली.