मुंबई : सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे. स्मार्टफोम आणि इंटरनेटवर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे. पण अनेक वेळा आपल्याला अनेक नियमांबद्दलची माहिती नसते. तुम्ही अजाणतेपणी किंवा मस्ती-मस्करी म्हणून केलेल्या गोष्टींमुळे तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतो. काही अशा गोष्टी आहेत, ज्या तुमच्यासाठी अतिशय छोट्या आहेत, मात्र कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला या वागणुकीसाठी जेलची हवा खावी लागू शकते. तुम्हाला माहित नसेल, पण विमानतळावर काही शब्दांचा वापर केल्यास तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. हे शब्द कोणते, यामागचं कारण काय आणि तुम्हाला काय शिक्षा होऊ शकते, हे सविस्तर जाणून घ्या.


अनेक वेळा लोक मस्तीमध्ये काही वक्तव्य करतात, ज्या कृतीमुळे त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. विमानतळावर काही लोक मस्करीमध्ये किंवा मस्तीसाठी बॉम्ब, बॉम्बस्फोट, हायजॅक अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करतात. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर या शब्दांचा वापर करण्यापासून सावधान राहा. नॅशनल किंवां इंटरनॅशनल एअरपोर्टवर बॉम्ब, हायजॅक या शब्दांचा वापर चुकूनही करू नका.


भारतासह जगभरातील विमानतळांवर काही शब्द बॅन आहेत. ज्यांचा वापर केल्या तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. विमानतळावर बोलताना मस्ती करताना सुद्धा काही शब्दांचा वापर केल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते. सुरक्षा कर्मचाऱ्याला तुमच्याकडून असा कोणताही शब्द ऐकू आला तर तुमची कसून चौकशी केली जाईल आणि तुमच्यावर कारवाई होऊन तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.


विमानतळावर कोणते शब्द वापरण्यास मनाई आहे?


विमानतळ आणि विमानात हायजॅक, दहशतवाद, बॉम्ब, स्फोटकांशी संबंधित शब्द वापरण्यास मनाई असून या शब्दांचा वापर करणे कायदेशीर गुन्हा आहे. कोणत्याही प्रवाशाने हे शब्द वापरले तर, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. एवढंच नाही तर संबंधित व्यक्तीला तुरुंगातही पाठवू शकतात.


प्रतिबंधित शब्दांचा वापर केल्यास कोणत्या कलमांखाली कारवाई केली जाईल?


सुरक्षा कर्मचारी विमानतळावर प्रवाशांची आणि सामानाची तपासणी करत असताना काही प्रवासी गंमतीने सांगतात की, ते काही बॉम्ब घेऊन जात आहेत किंवा इतर दहशतवादी शब्द वापरतात. भारतात अनेकदा अशी प्रकरणे समोर येतात. प्रवाशांच्या या कृत्यामुळे त्याच्यावर भारतीय कायद्याच्या विविध कलमांतर्गत कारवाई होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, भारतीय दंड संहितेचे कलम 182 - लोकसेवा अधिकाऱ्याला चुकीची माहिती देऊन, त्याच्या शक्तीचा वापर करून कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचवू शकतो, कलम 505(1)(b) - लोकांना दुखापत करणारी कृती, कलम 268 - भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने अफवा पसरवणे आणि कलम 268 - सार्वजनिक उपद्रव माजवणे, या विविध भादंवी कलम अंतर्गत कारवाई करण्यात येऊ शकते.


आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणत्या शब्दांवर बंदी आहे?


तुर्कीच्या पेगासस एअरलाइन्समध्ये दहशतवादी, बॉम्ब, क्षेपणास्त्र, शस्त्र, बंदूक आणि आग या शब्दांवर बंदी आहे. विविध शब्दांवर बंदी देशानुसार बदलू शकते. अमेरिकेत 9/11 हल्ल्याचा उल्लेख केल्यास कारवाई होऊ शकते. तर थायलंडच्या विमानतळ प्राधिकरणानुसार, बॉम्ब, स्फोटक, हायजॅक आणि दहशतवादी हल्ला या शब्दांचा वापर करण्यास मनाई आहे.विमानतळावर काही शब्दांचा वापर केल्यास तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. हे शब्द कोणते, यामागचं कारण काय आणि तुम्हाला काय शिक्षा होऊ शकते, हे सविस्तर जाणून घ्या.विमानतळावर काही शब्दांचा वापर केल्यास तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. हे शब्द कोणते, यामागचं कारण काय आणि तुम्हाला काय शिक्षा होऊ शकते, हे सविस्तर जाणून घ्या.