Social Welfare News नवी दिल्ली : भारतात पतंजली आयुर्वेदासह अनेक कंपन्या आणि संघटना आपल्या व्यवसायाच्या पुढं जाऊन सामाजिक जबाबदारीबद्दल केवळ जागरुक नसून समाजाला अधिक चांगलं बनवण्यासाठी सक्रिय प्रयत्न करत आहेत. या संस्था त्यांचं उत्पन्न आर्थिक केवळ कमाईपर्यंत मर्यादित न ठेवता सामाजिक आणि पर्यावरणीय सुधारणा यासाठी खर्च करतात. योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदकडून नियमितपणे मोफत आरोग्य शिबीर आयोजित केलं जातं, जिथं लाखो लोक योग शिकतात आणि आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये सुधारणा करतात. याशिवाय पतंजली सामाजिक कल्याणासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करतं याशिवाय आयुर्वेदिक औषधं स्वस्त दरात उपलब्ध करतं.
या कंपन्या सामाजिक कल्याणाच्या कामात अग्रेसर
पतंजलीशिवाय टाटा उद्योग समूह, इन्फोसिस फाऊंडेशन, विप्रो आणि महिंद्रा अँड महिंद्रा या सारख्या सामाजिक कल्याणाच्या कामात अग्रेसर आहेत. टाटा ट्रस्ट शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासात योगदान देतं. याशिवाय काही शाळा आणि रुग्णालयं देखील टाटांकडून चालवली जातात. ग्रामीण भागांमध्ये जलसंवर्धन आणि कृषी सुधारणांसाठी काम करतं.
महिंद्रा अँड महिंद्रानं'नन्ही कली' नावाचं अभियान सुरु केलं आहे, ज्याद्वारे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जातं. याशिवाय ग्रामीण भागात कौशल्य विकास आणि रोजगार विषयक बाबींसाठी काम करतात. याशिवाय इन्फोसिस फाऊंडेशन शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात कामकरतं. हे फाऊंडेशन शाळा आणि रुग्णालयांना आर्थिक मदत करतं. ग्रामीण क्षेत्रात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मदत करतं. विप्रोनं विप्रो अर्थियन नावाचं अभियान सुरु केलं आहे, जे पर्यावरण संरक्षण आणि स्थिरता वाढवण्यासाठी काम करतं. हे फाऊंडेशन जलसंवर्धन आणि ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात काम करतं.
नफ्याच्या 2 टक्के रक्कम सामाजिक कामासाठी खर्च
सामाजिक कल्याणाची जबाबदारी भारतात 2013 मध्ये कंपनी अधिनियमानुसार अनिवार्य करण्यात आली आहे. कायद्यानुसार कंपनीला त्यांच्या फायद्यापैकी 2 टक्के वाटा सामाजिक जबाबदारी म्हणून खर्च करावा लागतो. भारता याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजेच सीएसआर असंही म्हटलं जातं.
सामाजिक कल्याणाच्या कामामधील या संघटनांच्या किंवा संस्थाच्या योगदानामुळं भारत एक समृद्ध आणि सशक्त समाज होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाईल. या कंपन्यांकडून व्यावसायिक यश हे केवळ नफा मिळवणं नसू समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी काम करणं हा आहे.