नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत प्रचारादरम्यान सरकार आल्यावर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा होतील, असं आश्वासन दिलं होतं. त्याची काय स्थिती आहे, अशी विचारणा केंद्रीय सूचना आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला केली आहे.

 

राजस्थानच्या कन्हैया लाल नावच्या व्यक्तिने माहिती अधिकारांतर्गत केंद्रीय सूचना आयोगात अर्ज दाखल केला होता. मोदींनी दिलेल्या आश्वासनाची सद्यस्थिती काय आहे, अशी विचारणा त्यावर सुनावणी देताना सूचना आयोगाने पीएमओला केली आहे.

 

मोदींनी प्रचारात भ्रष्टाचार मिटवण्याचंही आश्वासन दिलं होतं. मात्र भ्रष्टाचार 90 टक्के वाढला आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, अशी विचारणाही अर्जादाराने केली आहे.