एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/03/2017

1. मुंबईत शिवसेनेचाच महापौर; भाजप महापौरपदाची निवडणूक लढणार नाही; मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, गरज पडल्यास शिवसेनेला मदत करण्याची ग्वाही https://goo.gl/oRDsKq

2. मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर, तर उपमहापौरपदासाठी हेमांगी वरळीकरांचा अर्ज दाखल, भाजपच्या माघारीमुळे निवडणूक औपचारिकता https://goo.gl/tL8JWP

3. ओला, उबेर टॅक्सींसाठी 'महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017' लागू, आता किमान आणि कमाल दर सरकार ठरवणार, टॅक्सीत GPS बंधनकारक https://goo.gl/icmnOF

4. शिवाजी पार्कवरील तिन्ही पक्षांची सेल्फी पॉईंटची परवानगी रद्द, स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर महापालिकेचा निर्णय https://goo.gl/vjY3Zn

5. नालासोपाऱ्यातील बिल्डरची मुंबईत घरात घुसून हत्या, बिल्डरची पत्नीही जखमी, हल्लेखोर पत्नीचा पहिला पती असल्याचा पोलिसांना संशय https://goo.gl/NrNcjf

6. मुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याची मस्करी मॉडेलला महागात, मॉडेल कांचन ठाकूरवर गुन्हा दाखल https://goo.gl/jf1x9O

7. सहप्रवाशाला लोकलमधून फेकून देण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल, मुंबई लोकलमधील प्रकार, वसई लोहमार्ग पोलिसांकडून कारवाई https://goo.gl/7lCkSk

8. मुलीला धडक देऊन पोलीस पुत्र फरार, ओळख पटूनही पुणे पोलिसांची कारवाईस टाळाटाळ, स्थानिक नागरिकांच्या संतापानंतर तक्रार दाखल https://goo.gl/QKck4M

9. लातुरात बारावीचा पेपर पुन्हा फुटला, परीक्षा सुरु असतानाच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल https://goo.gl/dGKh7o

10. ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवलेंच्या हत्येची सीबीआय चौकशी करा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची कोल्हापुरात मागणी, शोकाकूल वातावरणात किरवलेंवर अंत्यसंस्कार https://goo.gl/8bpmn3

11. उत्तर प्रदेश निवडणुकीचा वाराणसीत मेगा शो, पंतप्रधान मोदींसह अखिलेश यादव, राहुल गांधी, डिंपल यादव यांची एकाच दिवशी रॅली https://goo.gl/64uEKW

12. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश, कोर्टाकडून तीन आठवड्यांची मुदत https://goo.gl/KoCloJ

13. वडिलोपार्जित शेतीतून 13 एकरात 40 टन डाळिंबाचे उत्पादन, धुळ्यातील एसटी महामंडळ नियंत्रक राजेंद्र देवरेंची यशोगाथा https://goo.gl/ROCvM1

14. अमेरिकेत पुन्हा भारतीय वंशाच्या नागरिकाची हत्या, दक्षिण कॅरोलिनामध्ये हरनिश पटेल यांच्यावर अज्ञाताने गोळ्या झाडल्या https://goo.gl/tnMjEF

15. बंगळुरूत पुण्याचाच 'अॅक्शन रिप्ले', नॅथन लायननं 8 विकेट्स काढून टीम इंडियाचा 189 धावांत उडवला खुर्दा, ऑस्ट्रेलियाची पहिल्या दिवसअखेर बिनबाद 40 धावांची मजल https://goo.gl/krNolW
माझा कट्टा :

संध्या. 7 वाजता – शिवसेना आमदार अनिल परब यांच्याशी गप्पा

रात्री 9 वाजता - मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याशी गप्पा

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर