1. फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, आमदारांचं निलंबन मागे घेणार, 29 मार्चला 12 आमदारांचं तर 7 एप्रिलला उर्वरित 7 आमदारांचं निलंबन रद्द करणार, सूत्रांची माहिती https://gl/JyB59N 


 

  1. पंतप्रधान मोदींकडून उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण, सेना-भाजप वाद, राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता https://gl/tsNieh 


 

  1. नाशकात पोलीस भरतीसाठी तरुणाची अनोखी उचापत, उंची वाढीव दिसावी म्हणून चक्क डोक्यावर विग, बिंग फुटल्यानंतर तरुणाविरोधात तक्रार https://gl/OIWfCv 


 

  1. आशियातील सर्वात मोठ्या महापालिकेच्या बजेटची तारीख ठरली, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 29 मार्चला! https://gl/82lwvM


 

  1. नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली, पुणे परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती


https://goo.gl/d5TAUj 

  1. ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने निघालेले खासदार रवींद्र गायकवाड मुंबईत आलेच नाहीत, वापीतून खासगी वाहनाने उस्मानाबादकडे रवाना https://gl/QRMwu4 


 

  1. शिवस्मारक जागतिक उंचीचं ठरणार, चीनमधल्या बुद्ध पुतळ्यापेक्षा 2 मीटर अधिक उंचीच्या पुतळ्याचा प्रस्ताव, 210 मीटरपर्यंत उंची वाढवण्याच्या हालचाली https://gl/929GFZ 


 

  1. इंदू मिलच्या जमिनीचं राज्य सरकारकडे हस्तांतरण, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणींच्या उपस्थितीत जमिनीचा ताबा सुपूर्द, बाबासाहेबांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा  https://gl/EMRlup 


 

  1. अखेर मुंबईत AC लोकल धावली, मुंबईकरांचा गारेगार प्रवास नजरेच्या टप्प्यात, ठाणे-टिटवाळ्यादरम्यान 'ट्रायल रन' https://gl/LClnKi


 

  1. पाटण्यात गर्दीमुळे कार्यक्रमाचं स्टेज कोसळलं, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव जखमी


https://goo.gl/ra3I3L 

  1. आधार कार्डचं महत्त्व आणखी वाढलं, IT रिटर्न, पॅनकार्डपाठोपाठ आता नव्या मोबाईलसाठीही आधारकार्ड बंधनकारक https://gl/ifTjx3


 

  1. विजय मल्ल्यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, प्रत्यार्पणाला ब्रिटिश सरकारची मंजुरी https://gl/opAjCN तर सेबीचा रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका, एक हजार कोटींचा दंड https://goo.gl/IpSXSb


 

  1. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर आटोपला, 4 विकेट्स घेत फिरकीपटू कुलदीप यादवचं दणक्यात पदार्पण, दुखापतीमुळे कोहली बाहेर https://gl/l01IDy


 

  1. कोहलीच्या 'डेडिकेशन'ला क्रिकेटप्रेमींचा सलाम, टीम इंडियासाठी स्वत: कोहली बनला वॉटर बॉय! https://gl/1pI85c


 

  1. 'भाबीजी घर पर है' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेची निर्मात्याविरोधात तक्रार, छेडछाड केल्याचा आरोप https://gl/55fdQ0


 


*पत्रकारितेतील ऋषी- गोविंदराव तळवलकर यांची दुर्मीळ मुलाखत* - रात्री 9. वा @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*