पाटण्यात स्टेज कोसळल्याने लालू प्रसाद यादव जखमी
एबीपी माझा वेब टीम | 25 Mar 2017 02:33 PM (IST)
पाटणा : पाटणामध्ये पुन्हा एकदा प्रचंड गर्दीमुळे स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाटण्यातील इंदिरा गांधी आयुर्विज्ञान संस्थेमध्ये उपचार सुरु आहेत. कमरेखालील भागाला दुखापत झाली असून सूजही आल्याचं लालू यादव यांनी सांगितलं. उक्त यज्ञ कार्यक्रमाच्या वेळी मंचावर प्रचंड गर्दी झाल्याने स्टेज कोसळला, असंही ते म्हणाले. लालू प्रसाद यादव गंगा नदी किनाऱ्यावरील दीघा टावर उक्त यज्ञ कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रवचन आणि कथा वाचनानंतर लालूंनी स्थानिकांना संबोधित केलं. ते मंचावरुन उतरत असतानाच, तिथे मोठी गर्दी झाली. त्यानंतर मंच कोसळला. यावेळी लालू यादव जखमी झाले. लालू प्रसाद यादव यांची दुखापत गंभीर नाही. त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असं राजदच्या एका नेत्याने सांगितलं. पाहा व्हिडीओ