500-1000च्या जुन्या नोटांचं आरबीआय करणार तरी काय?
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2016 03:46 PM (IST)

मुंबई: 500 आणि 1000च्या नोटा 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून चलनातून रद्द झाल्या तर या नोटा आज मध्यरात्रीपर्यंतच काही ठराविक ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहेत. सुरुवातीला एका दिवसाला 4000 पर्यंतच्या नोटाच बदलून मिळत आहे. कालपासून नोटा बदलण्याचं आणि नोटा बँकेत जमा करणं सुरु झालं आहे. पण या जुन्या नोटांचं रिझर्व्ह बँक नेमकं करणार तरी काय? हा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. आरबीआयला मिळणाऱ्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचं सर्वात आधी करन्सी व्हेरिफिकेशन अँड प्रोसेसिंग सिस्टम (सीव्हीपीएएस) करण्यात येईल. ज्यामुळे नोटा खऱ्या आहेत की खोट्या हे समजेल. त्यानंतर खऱ्या नोटांचा कागद नव्या नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. नकली नोटांचाही वापर आरबीआय पेपरवेट, कॅलेंडर, फाइल यांच्या वापरासाठी करु शकतं. देशात अनेक ठिकाणी 500 आणि 1000च्या नोटा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, जाळलेल्या अवस्थेत सापडत आहेत. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्यासाठी या नोटा आता एका कागदाप्रमाणेच आहे. पण ज्यांची खरी कमाई आहे ते आपल्या नोटा बँकेत जाऊन बदलू शकतात किंवा ती रक्कम बँकेत जमा करु शकतात. संबंधित बातम्या:बँकेत पैसे जमा करताच थेट आयकर विभागाला माहिती पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट, सेकंड एसी वेटिंग तिकिटांवर बंदी कर्नाटकच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटल्यामागचं व्हायरल सत्य लाचखोर अधिकाऱ्याचेही चोचले, शंभरच्याच नोटा देण्याची तंबी एक हजाराची नवी नोट लवकरच येणार!, अर्थ मंत्रालयाची माहिती नोटा बदलण्यासाठी 5 सोप्या टिप्स बँकेकडून 100 ऐवजी, 10, 20 किंवा चिल्लरही हातात येऊ शकते!बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जुन्या नोटा बदलून मिळणार सर्व बँका गुरुवारी एक तास आधी सुरु, शनिवार-रविवारीही सुट्टी नाही सर्व रुग्णालयांनी 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारणं बंधनकारक मुंबईत सुट्ट्या पैशांसाठी नागरिकांची दलालांकडून लूट मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुंबई मेट्रो प्रशासनाची मुजोरी कायम नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार 500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तरनोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारलाएकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामीटोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्तापआरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलकदेशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्पकधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द