India Time Zone : जगात एकाच वेळी प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळी वेळ असले. म्हणजे भारतात जर सकाळ झाली असेल तर त्याचवेळी अमेरिकेत रात्र असते. त्याचनुसार त्या त्या देशाची वेळ निश्चित केली जाते. जेव्हा यंत्रांचा किंवा मशिनचा शोध लागला नव्हता त्यावेळी वेळेची अडचण यायची नाही. पण काळाबरोबर तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि मनुष्य जगभर फिरू लागला. त्यावेळी त्याला प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या वेळांची अडचण येऊ लागली. त्यावर उपायही शोधण्यात आला आणि तो म्हणजे टाईम झोन.
जगातील प्रत्येक देशाचा स्वतःचा असा टाईम झोन आहे. तुम्ही कोणत्याही देशात गेलात तर तुम्हाला त्यानुसार घड्याळ सेट करावे लागेल. भारतात जर संध्याकाळी 4 वाजले असतील तर त्यावेळी अमेरिकेतही तीच वेळ असेलच असं नाही. भारत आणि अमेरिका यांच्या वेळेत सुमारे 10:30 तासांचा फरक आहे. म्हणजेच भारतात सकाळ असेल तर त्यावेळी अमेरिकेत आदल्या दिवशीची रात्र असेल.
जगात सर्वांची वेळ एकच नाही. याच्या मागे आपली सूर्यमाला आहे, जिथे पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे आणि त्या त्या देशाच्या अक्षावरही फिरत आहे. सूर्याभोवती फिरत असताना, पृथ्वीचा जो भाग सूर्याकडे असतो तो दिवस असतो आणि दुसरा भाग रात्र असतो. यामुळेच जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये टाईम झोन वेगवेगळे आहेत.
Indian Standard Time : वेळ बदलल्यामुळे अडचणी
जेव्हा यंत्रांचा शोध लागला नव्हता तेव्हा कोणतीही समस्या नव्हती. काळाबरोबर तंत्रज्ञान आले आणि मानव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागला. प्रवास केल्यानंतर सर्वात मोठी अडचण आली म्हणजे वेळेची. एखादी व्यक्ती एका जगाच्या एका कोपऱ्यातून चालत दुसऱ्या ठिकाणी पोहोचली तर तिथे वेळेनुसार गोंधळ सुरू झाला. एवढेच नाही तर प्रवासाची साधने म्हणजे विमानं, गाड्या, जहाजे उशिराने धावू लागल्या.
What Is Time Zone : टाईम झोनची संकल्पना कुठून आली?
सर सॅनफोर्ड फ्लेमिंग यांनी टाईम झोनची संकल्पना मांडली. त्यांनी जगाला 24 टाईम झोनमध्ये विभागण्याची सूचना केली. यानंतर 1884 मध्ये इंटरनॅशनल प्राईम मेरिडियन कॉन्फरन्स बोलावण्यात आली. यामध्ये इंग्लंडच्या ग्रीनविचची प्राईम मेरिडियन म्हणून निवड करण्यात आली. म्हणजे ग्रीनविच (Greenwich Mean Time) हे शहर 0 डिग्री रेखावृत्तावर ठेवण्यात आले होते. इथून पूर्वेला म्हणजे भारताकडे जाताना वेळ वाढतो आणि पश्चिमेला, म्हणजे अमेरिकेकडे जाताना वेळ कमी होतो. जगातील अनेक देश या आधारावर त्यांचे टाईम झोन ठरवतात.
India Time Zone : भारतातील वेळ कशी ठरवली जाते?
ब्रिटिश राजवटीत 1884 साली भारतात टाईम झोन स्वीकारण्यात आले. स्वातंत्र्यापूर्वी येथे तीन टाईम झोन होते. त्यात मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई यांचा समावेश होता. पण यामुळे एक समस्या निर्माण झाली की जर कोणी मुंबईहून चेन्नईला गेले तर त्याला घड्याळाची वेळ बदलावी लागायची. अशा परिस्थितीत, स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये भारतीय मानक वेळ (IST) घोषित करण्यात आली आणि त्यानुसार भारतात एकच वेळ ठरवण्यात आली.
भारताचा वेळ हा ग्रीनविच वेळेनुसार 5.30 तास पुढे ठरवण्यात आला. त्यासाठी मिर्झापूर शहराचे 82°30′ पूर्व हे रेखावृत्त ठरवण्यात आले. त्यानुसार भारतातील अरूणाचल प्रदेश आणि गुजरात राज्यातील सुर्योदयाच्या वेळत तब्बल दोन तासांचे अंतर आहे.