पश्चिम रेल्वेवर 13 नोव्हेंबरनंतरच्या प्रवासांसाठी फर्स्ट एसी किंवा सेकंड एसीच्या तिकीटांचं वेटिंग लिस्टमध्ये काऊंटरवर बुकिंग न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त ऑनलाईन बुकिंग करतानाच फर्स्ट एसी आणि सेकंड एसीच्या तिकीटांचं वेटिंग लिस्टमध्ये तिकीट मिळेल. 10 आणि 11 नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी हा नियम लागू करण्यात येत आहे.
एका वेळेला 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची तिकीटं बूक करायची असल्यास पॅनकार्ड दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. 11 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत हा नियम लागू राहील. बूक केलेलं तिकीट रद्द करुन रेल्वेकडून पुन्हा रिफंड घेण्याची नामी शक्कल अनेकांनी अवलंबली आहे. मात्र या सर्व तिकीट बूक करणाऱ्यांवर सरकारची देखील करडी नजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500, 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नोटा बदलण्यासाठी देशभरात एकच गर्दी झाली आहे. 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर जुन्या नोटा रेल्वे स्टेशल, एअरपोर्ट, बस स्थानक, रुग्णालय अशा ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहेत. रेल्वे स्टेशनवर जुन्या नोटा खपवण्याची धडपड सरकारच्याही लक्षात आल्याने कडक पाऊल उचलण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या