नोटा रद्द करण्याचा निर्णय एका आठवड्यासाठी मागे घ्या : मुलायम सिंह
एबीपी माझा वेब टीम | 10 Nov 2016 03:21 PM (IST)
नवी दिल्ली : नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी एक आठवड्यासाठी मागे घ्यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केली आहे. यापूर्वी बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनीही या निर्णयावर टीका करत ही अप्रत्यक्ष आणीबाणी असल्याचं मत वक्तव्य केलं. नागरिकांना नियमित गरजेच्या वस्तू मिळणं देखील कठीण झालं आहे. बाजारपेठा देखील बंद आहेत. रुग्णांवरील उपचार बंद झाले आहेत आणि भाजपला निवडणुका दिसत आहेत, अशा शब्दा मुलायम सिंहांनी टीका केली. दरम्यान मुलायम सिंह यांनी सरकारच्या या निर्णयासोबत असल्याचंही सांगितलं. मात्र महिलांनी एक एक रुपया जमा करत घरगुती बचत केली आहे. त्यामुळे महिलांना पाच लाखांपर्यंत सूट देण्यात यावी, असं मुलायम सिंह म्हणाले. सरकारने महिलांना अडीच लाखांपर्यंतची रक्कम विना चौकशी जमा करण्याची मुभा दिली आहे. मात्र त्यानंतरच्या रकमेसाठी आयकर विभाग चौकशी करणार आहे. रक्कम संशयित आढळल्यास त्यावर 200 टक्के दंड आकारणार आहे. संबंधित बातम्या