कोलकाता : पश्चिम बंगाल राज्याचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला आहे. बंगाली भाषेत 'बंग' किंवा 'बांगला' तर इंग्रजीत 'बंगाल' हे नाव देण्याच्या हालचाली सुरु आहेत.


 

पश्चिम बंगाल विधानसभेचं विशेष सत्र बोलावून 26 ऑगस्ट रोजी यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर संसदेकडे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.

 
या राज्याला 'पश्चिम बंग' किंवा 'पश्चिम बांग्ला' असं आतापर्यंत बंगाली भाषेत संबोधलं जात होतं, तर इंग्रजीत वेस्ट बेंगॉल हे नाव रुढ आहे. त्यापैकी पश्चिम हा शब्द काढून टाकण्याची तयारी आहे. 2011 मध्येही राज्याचं नाव बदलण्याचे प्रयत्न सरकारकडून केले गेले होते.

 
संसदेच्या पहिल्या सत्रात पश्चिम बंगालचे खासदार हा मुद्दा उपस्थित करतील. संसदेने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास इंग्रजी वर्णमालेनुसार 28 व्या क्रमांकावर येत असलेल्या 'वेस्ट बेंगॉल'ला थेट चौथं स्थान मिळेल.

 

 

https://twitter.com/ANI_news/status/760422275485016065