West Bengal SSC Scam : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याबाबत (West Bengal SSC Scam) ईडीकडून (ED) कारवाई सुरु आहे. याप्रकरणी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर चॅटर्जी यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) यांच्यावर देखील ईडीनं कारवाई केली आहे. त्यांना ईडीनं अटक केली आहे. त्यांच्या घरातून कालच 28 कोटी रुपयांच्या रोकडसह 5 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. अशातच अर्पिता चॅटर्जी यांनी अटक केल्यानंतर डायमंड सिटी येथील त्यांच्या निवासस्थानातून चार अलिशान गाड्या गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोन गाड्या अर्पिता मुखर्जीच्या नावावर आहेत.


अर्पिता चॅटर्जी यांना अटक केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानातून चार अलिशान गाड्या गायब झाल्या आहेत. यामधील दोन गाड्या अर्पिता मुखर्जी यांच्या नावावर आहेत. गायब झालेल्या गाड्यांमध्ये Audi A4, Honda City, Honda CRV आणि Mercedes Benz या गाड्या आहेत. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी अर्पिताच्या बेलघरिया फ्लॅटमधील सीसीटीव्हीचे तपशील मागवले आहेत. ईडीचे अधिकारी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 


दरम्यान, गुरुवारी पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांची चौकशी केली. दोघांचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत इतर मालमत्तांची अनेक ठिकाणे सापडली आहेत. मागील दोन फ्लॅट्सशिवाय बेलघारियामध्ये आणखी दोन फ्लॅट सापडले आहेत. त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.


माणिक भट्टाचार्य यांना पुन्हा बोलावले


पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांचे ओएसडी सुकांता आचार्य यांनाही गुरुवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. शारीरिक आजाराचे कारण सांगून ते आले नाहीत. दरम्यान, बुधवारी 14 तासांच्या चौकशीनंतर माणिक भट्टाचार्य यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्याचवेळी, पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना आज नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: