Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाबाधितांसह मृत्यूची संख्या किंचित घटली आहे, मात्र धोका कायम आहे. देशात गुरुवारी 20 हजार 409 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला. आजच्या रुग्णसंख्येत किंचित घट झाली असली तरी देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारांवर पोहोचली आहे.


कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक 


देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचिंत कमी झाली असली, तरी आरोग्य विभागासमोर चिंतेचं वातावरण आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात गेल्या 24 तासांत 22 हजार 697 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.


महाराष्ट्रात 2203 नव्या रुग्णांची नोंद


महाराष्ट्रात गुरुवारी 2203 नव्या रुग्णांची भर पडली असून 2478 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच गेल्या 24 तासांत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी राज्यात 2138 रुग्णांची भर पडली होती. राज्यात आतापर्यंत 78,79,766 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. 






दिल्लीत कोरोनाचे 1,128 नवीन रुग्ण


देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 1,128 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या दिल्लीत कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 6.56 टक्के आहे. आरोग्य विभागाने नवी आकडेवारी जारी करत ही माहिती दिली आहे. दिल्लीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोनाबाधितांची संख्या एक हजारांहून अधिक आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या