Share Market latest Updates : शेअर बाजारात सुरुवातीलाच उसळण पाहायला मिळाली आहे. बाजार सुरु होताच सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीनं (Nifty) घोडदौड सुरु केल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 603 अंकांनी वधारला, तर निफ्टीनंही 187 अंकांनी उसळण घेती. निफ्टीनं 17 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. फेडच्या निर्णयानंतर आणि आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीआधी रुपया मजबूत स्थितीत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 79.53 वर उघडला आहे. रुपयात 23 पैशांनी अधिक वाढ होऊन मजबूत झाला आहे. रुपयामध्ये पतधोरण समितीच्या बैठकीआधी रिकव्हरी झालेली पाहायला मिळतेय. जागतिक बाजरातील चांगल्या रिकव्हरीनंतर भारतीय शेअर बाजारातही तेजी पाहायला मिळत आहे.
शेअर बाजराची चांगली सुरुवात
शुक्रवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 400 हून अधिक अंकांनी उसळी घेत 57,258.13 वर सुरुवात केली. तर निफ्टीही 49.90 अंकांनी वधारल्याचं पाहायला मिळालं. बाजार सुरु होताच 17,079.50 वर व्यवहार करत होता. कच्च्या तेलाच्या वाढत्या मागणीमुळे भाव 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक भारताकडून बाहेर काढण्याची स्थिती मंदावली आहे. अमेरीकेतील येणाऱ्या मंदीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे.
आज कमाई करणारे शेअर्स
आज सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, एमअँडएम, पॉवरग्रिड, टेक महिंद्रा, विप्रो, कोटक बँक आणि एचसीएल टेकसह अनेक शेअर्समध्ये तेजीत पाहायला मिळत आहे. चांगल्या खरेदीमुळे बजाजही तेजीतत आहे.
आज घसरलेले शेअर्स
आज घसरलेल्या शेअर्समध्ये सन फार्माचा समावेश आहे. सन फार्मा 4.25 टक्क्यांनी घसरला असून याची घसरण सुरुच आहे याशिवाय, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, सिप्ला आणि डीव्हीएस लॅबच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या