प. बंगालमध्ये गंगा नदीत बोट उलटून अनेक जण बुडल्याची भीती
एबीपी माझा वेब टीम | 15 May 2016 11:46 AM (IST)
कोलकाता : पश्चिम बंगालमधील वर्धमानमध्ये गंगा नदीत बोट उलटून अपघात झाला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली असून अनेक जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वर्धमान ते शांतिपूर दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले होते. 60 ते 70 प्रवासी नेण्याची क्षमता असलेल्या या बोटीमध्ये दीडशेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याचं म्हटलं जातं. यापैकी पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत. दरम्यान पोलिसांनी आणि प्रशासनानं क्षमतेपेक्षा जास्त लोकांना वाहून नेणाऱ्या बोटींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये एक पोलिस निरीक्षक आणि एक पोलीस शिपाई जखमी झाला आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु न झाल्याने शांतिपूर घाटावर संतप्त नागरिकांनी बोट पेटवून निषेध केला.