कोलकाता : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही पश्चिम बंगालचे राजकारण तापत असल्याचं दिसून येतंय. सीबीआयने नारदा स्टिंग प्रकरणात ममता बॅनर्जी यांच्या सरकामधील दोन मंत्री आणि एका आमदाराला तसेच पक्षाच्या एका माजी नेत्याला आज अटक केली आहे. आता या सर्वांवर आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सीबीआय करत आहे. पश्चिम बंगालचे राजकारण ढवळून काढणाऱ्या नारदा स्टिंग प्रकरणामध्ये अनेक नेत्यांनी पैशाचा गैरव्यवहार केल्याचं समोर आलं होतं.


आरोपपत्र दाखल होणार
अटक केलेल्या नेत्यांमध्ये फिरहाद हाकिम, सुब्रतो मुखर्जी, मदन मित्रा आणि तृणमूलच काँग्रेसचे माजी नेते शोभन चटर्जी यांचा समावेश आहे. आज या सर्वांना सीबीआयने अटक केली आहे. नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणात सीबीआय आता आरोपपत्र दाखल करणार असून त्यामुळेच या नेत्यांना अटक करण्यात आली असल्याचं एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. 


 




ममता बँनर्जी सीबीआयच्या कार्यालयात
या चार नेत्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर कोलकात्याच्या निजाम पॅलेसमध्ये ठेवण्यात येणार होतं. पक्षाच्या नेत्यांच्या अटकेची बातमी समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तडक सीबीआयचे कोलकात्यातील कार्यालय गाठलं. 


राज्यपालांची अटकेला परवानगी
सीबीआयने या चार नेत्यांना अटक करण्याआधी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची परवानगी घेतली होती. हा घोटाळा 2014 सालचा आहे. आता ज्यांना सीबीआयने अटक केली आहे ते सर्वजण त्यावेळी मंत्री होते. राज्यपालांनी या सर्वांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी सीबीआयला परवानगी दिली होती. त्यामुळे सीबीआयने आता आरोपपत्र दाखल करण्याची तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणून या चार नेत्यांना अटक केली आहे. 


काय आहे प्रकरण? 
नारदा स्टिंग ऑपरेशन हे नारदा टीव्ही न्यूज चॅनेलच्या वतीनं मॅथ्यू सॅम्युअलने 2014 साली केलं होतं. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते, मंत्री हे लाभाच्या बदल्यात कंपनीकडून पैसे घेताना कॅमेरात कैद झालं होतं. कोलकाता न्यायालयाने 2017 साली या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश दिला होता.  


महत्वाच्या बातम्या :