फ्लोराडिया : अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या 69 व्या मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेचा निकाल लागला असून भारताच्या अॅडलिन कॅसेलिनोला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. मिस मेक्सिको असलेल्या अॅन्ड्रिया मेझाने या वर्षीचा मिस युनिव्हर्सचा मुकुट पटकावला आहे. त्यामुळे भारतात तिसऱ्यांदा हा खिताब येणार का याची उत्सुकता आता संपली आहे. 


 




जर अॅडलिन कॅसेलिनोने हा किताब जिंकला असता तर अशी कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली असती. या आधी 1994 साली सुश्मिता सेन आणि 2000 साली लारा दत्ता यांनी हा किताब जिंकला आहे. 


 






कोण आहे अॅडलिन कॅसेलिनो? 
अॅडलिन कॅसेलिनोचा जन्म कुवेत येथे झाला आहे. वयाच्या 15 व्या वर्षी ती भारतात आली आणि मुंबई येथे सेटल झाली. अॅडलिन कॅसेलिनोच्या परिवाराची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची असून ते कर्नाटकातील उदयवारा या ठिकाणचे आहे. अॅडलिन कॅसेलिनोने या आधी अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला आणि त्या जिंकल्या आहेत. तिने LIVA Miss Diva 2020 किताब पटकावला आहे. 


शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या 'विकास सहयोग प्रतिष्ठान' या संघटनेसोबत डलिन कॅसेलिनो काम करत आहे. तसेच ती पीसीओएस फ्री इंडिया कँपेनचा चेहरा आहे. तसेच डलिन कॅसेलिनो ही महिला आणि एलजीबीटी समुदायासाठीही काम करते. तिला फेमिना मॅगेजिनच्या मुख्यपृष्ठावर स्थान मिळालं आहे. मिस युनिव्हर्समध्ये रॅम्प वॉक करताना तीने भारतीय पद्धतीची साडी नेसली होती. त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. आपण भविष्यात अभिनयाकडे वळणार असल्याचं संकेत तिने दिले आहेत. 


महत्वाच्या बातम्या :