West Bengal Exit Poll 2021 : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपनं आपली संपूर्ण ताकत पणाला लावली आहे. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार टीएमसीला बंगालमध्ये 152 ते 165 जागा मिळणार आहेत तर भाजपला 109 ते 121 जागा मिळतील तर काँग्रेस-लेफ्ट आघाडीच्या खात्यात 14 ते 25 जागा जाणार असल्याचा अंदाज आहे.  


कुणाला किती मतांचा टक्का
मागील 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीचा वोट शेअर 44.9 टक्के होता तर भाजपचा 10.2 टक्के होता. काँग्रेस लेफ्ट आघाडीला 37.9  टक्के मतं मिळाली होती तर इतरांच्या खात्यात 7 टक्के मतं होती.  बंगालच्या 2021 च्या निवडणुकीत एक्झिट पोलनुसार यावेळी टीएमसीला 42.1 टक्के मतं मिळतील म्हणजे  टीएमसीला 2.6  टक्के मतांचं नुकसान होणार आहे. तर भाजपच्या खात्यात 39.9  टक्के मतांची टक्केवारी येणार असल्याचा अंदाज आहे. भाजपला 30 टक्के मतांचा फायदा होत असल्याचं यात दिसत आहे.  


काँग्रेस-लेफ्ट आघाडीचं मोठं नुकसान 


काँग्रेस-लेफ्ट आघाडीचं 15.4 टक्के वोट शेअर कमी होत असताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेस-लेफ्ट आघाडीचं 23.8 टक्के मतांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  


[DISCLAIMER: बंगालमध्ये 8 टप्प्यातील मतदान आज संपलं. तर तामिलनाडु, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमधील मतदान 6 एप्रिलला पूर्ण झालं होतं. एबीपी न्यूजसाठी सी वोटर या संस्थेनं पाच निवडणुका झालेल्या राज्यांमध्ये सर्वे केला. या सर्व्हेमध्ये 1 लाख 88 हजार 473 मतदात्यांची मतं जाणून घेण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पश्चिम बंगालमधील 85 हजार मतांचा समावेश आहे. या एक्झिट पोलमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 टक्के आहे.