WB 8 Phase Voting : पश्चिम बंगालमध्ये आज शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज आठव्या टप्प्यातमालदा, इंग्रेजबाजार, बहरामपूर, डोमकल, कांडी, चौरंगी, एन्टाली, जोरसांको, शामपुकूर, माणिकटला, काशीपूर-बेलगाछिया, बोलपूर, सूरी, लवपूर या जिल्ह्यातील 35 जागांसाठी मतदान सुरु आहे. तीन वाजेपर्यंत 68.46 टक्के मतदान झालं असल्याची माहिती आहे. 2 मे रोजी सर्व विधानसभा जागांचा निकाल जाहीर होणार असून ममता बॅनर्जी आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होतात की भाजप सत्तापालट करणार, काँग्रेस आणि डावे काय करिष्मा करणार याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे. 


पश्चिम बंगालमध्ये पहिला टप्प्यात 26 मार्च रोजी दंतन, एग्रा, झारग्राम, पुरुलिया, रानीबंध, खेजुरी, खडगपूर, जयपूर या सहा जिल्ह्यातील 30 जागांसाठी 84.63 टक्के मतदान झालं. 


 दुसरा टप्प्यात 1 एप्रिल रोजी नंदीग्राम, केशपूर, सबंग, पिंगळा, घाटाळ, तळदंगरा, कोतलपूर, हल्दिया, गोसाबा, तामलुक या दहा जिल्ह्यातील 30 जागांसाठी 86.11 टक्के मतदान झालं. 


 तिसऱ्या टप्प्यात  6 एप्रिल रोजी रायडीगी, बसंती, सातगछिया, पल्टा, आमता, हरिपाल, पुरशुरा, गोघाट, खानकुल, कॅनिंग या जिल्ह्यातील 31 जागांसाठी 84.61 टक्के मतदान झालं. 


 चौथ्या टप्प्यात 10 एप्रिल रोजी जाधवपूर, कसबा, भंगार, सोनारपूर उत्तर, तालीगंज, बेहला पूर्व, बेहला पश्चिम, बजावाज, बाली, शिबपूर, डोमजूर, उत्तरपारा, सिंगूर, दिनहाटा, अलीपुरद्वार, मदारिहाट, फलकटा या जिल्ह्यातील  44 जागांसाठी 79.90 टक्के मतदान झालं आहे. 


 पाचव्या टप्प्यात 17 एप्रिल रोजी डमडम, बारानगर, कमरहाती, पानीहाती, बिधाननगर, राजारहाट, गोपाळपूर, मध्यमग्राम, बरसात, सिलीगुडी, दार्जिलिंग, कालीमपोंग या जिल्ह्यातील 45 जागांसाठी 82.49 टक्के मतदान झालं आहे. 


 सहाव्या टप्प्यात  22 एप्रिल रोजी चोपडा, इस्लामपूर, रायगंज, नैहाती, बिजपूर, भटपारा, बॅरेकपूर, डुमडम उत्तर, मंगलकोट, कटवा, खर्डा, केतूग्राम, इटहार या जिल्ह्यातील 43 विधानसभांच्या जागांसाठी 82.00  टक्के मतदान झालं आहे. 


सातव्या टप्प्यात  26 एप्रिल रोजी कोलकाता बंदर, भवानीपूर, रासबिहारी, बालीगंज जिल्ह्यातील 34 जागांसाठी 76.89  टक्के मतदान झालं आहे. 


तर आज  आठवा टप्प्यात 29 April एप्रिल रोजी मालदा, इंग्रेजबाजार, बहरामपूर, डोमकल, कांडी, चौरंगी, एन्टाली, जोरसांको, शामपुकूर, माणिकटला, काशीपूर-बेलगाछिया, बोलपूर, सूरी, लवपूर या जिल्ह्यातील 35 जागांसाठी मतदान सुरु आहे. तीन वाजेपर्यंत 68.46 मतदान झालं आहे.