Hiranandani Group Raid : हिरानंदानी समूहाच्या मालमत्तांवर आयकर खात्यानं (IT Raid) आज छापे टाकले आहेत. मुंबई (Mumbai), बंगळुरू (Bengaluru), चेन्नई (Chennai) शहरांत 24 ठिकाणी आयकर पथकाकडून तपासणी सुरू आहे. हिरानंदानी समूहाच्या देशभरातील मालमत्तांवर आयकर खात्यानं एकाच वेळी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत. परदेशी मालमत्तेसंदर्भात ही छापेमारी असल्याचं कळतंय मात्र याबाबत हिरानंदानी समुहाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला आहे.
दुसरीकडे मुंबईत ईडीनंही छापेमारी केली आहे. बडे बांधकाम व्यावसायिक ईडीच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. एवढंच नाहीतर, बांधकाम व्यावसायिकाचं राजकीय कनेक्शनही ईडी तपासणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबईसोबतच ठाण्यातही ईडी छापेमारी करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी ईडी छापे टाकण्याच्या तयारीत आहे. पँडोरा पेपर्स प्रकरणी मोठा बांधकाम व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहे. या बांधकाम व्यावसायिकाचं राजकीय कनेक्शनही ईडी तपासणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड प्रॉपर्टी संदर्भात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं समोर आल्यानंतर ईडीनं अटक केली होती. गेल्या 23 फेब्रुवारीला नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पंधरा दिवस कोठडी मिळाल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यासंदर्भात आज कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड याठिकाणी ईडीचे काही अधिकारी आलं आणि त्यांनी या संदर्भात चौकशीला सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांच्या संदर्भात काही तक्रारीसुद्धा आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज त्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी सीआरपीएफच्या गोवावला कंपाउंडला आले असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे हिरानंदानी समूहावर करण्यात आलेल्या आयकर विभागाच्या कारवाईचंही कनेक्शन नवाब मलिक यांच्याशी असल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha