Weather Update : देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक राज्यांमध्ये पारा घसरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून धुक्याची चादरही पसरल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील भागांत बर्फवृष्टीमुळे लेह-लडाख यांसारख्या जागांवर पारा उणे अंशांवर पोहोचला आहे. त्यासोबतच दिल्ली, राजस्थान, पंजाब, ओदिशा या राज्यांतही थंडी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये येत्या काही दिवसांत वाढत्या थंडीपासून दिलासा मिळू शकतो. IMD ने म्हटलंय की, 5 जानेवारी 2022 पर्यंत भारतातील बहुतांश भागात थंडीची लाट राहणार नाही. पण आज म्हणजेच, 24 नोव्हेंबर रोजी देशाच्या विविध भागात थंडीची लाट येऊ शकते.


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबरपर्यंत काही राज्यांमध्ये थंडीची लाट येऊ शकते. त्यामुळे वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असून त्याचा परिणाम काही राज्यांच्या हवामानावर होऊ शकतो. दुसरीकडे, थंडीमुळे नवीन वर्षाचे नियोजन करू न शकलेल्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे, ओदिशा वगळता देशातील अन्य कोणत्याही राज्यात येत्या आठवडाभरात थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. पुढच्या 24 तासांत ओदिशामध्ये वेगवेगळ्या भागांत थंडीची लाट येऊ शकते. 


बिहारमध्ये वाढू शकते थंडी 


बिहारच्या काही भागांत आज थंडी वाढू शकते. हवामान विभागानं सांगितलं आहे की, बिहारमधील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. IMD ने आपल्या एका अंदाजात म्हटले आहे की, 27 ते 30 डिसेंबर दरम्यान, सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे बिहारच्या अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
 
राजस्थानमध्ये थंडीचा कडाका कमी होणार 


राजस्थानमध्ये थंडीचा कहर कमी होणार आहे. दरम्यान, IMD नं सांगितलंय की, 24 आणि 25 डिसेंबर रोजी राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये थंडी वाढणार असून धुक्याची चादर पसरेल. तसेच 26 ते 28 डिसेंबर दरम्यान राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.